coronavirus: कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला हॉवर्डच्या प्राध्यापकांनी दिलं असं उत्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:24 PM2020-05-27T12:24:23+5:302020-05-27T12:33:28+5:30

आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला.

coronavirus: When will the coronavirus vaccine come? Rahul Gandhi's question to professor BKP | coronavirus: कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला हॉवर्डच्या प्राध्यापकांनी दिलं असं उत्तर... 

coronavirus: कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला हॉवर्डच्या प्राध्यापकांनी दिलं असं उत्तर... 

Next
ठळक मुद्दे तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल.पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत ते सातत्याने तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला. त्यानंतर प्राध्यापक झा यांनीही त्याला तितक्याच सफाईदार पद्धतीने उत्तर दिले.

आज झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी विचारले की, भावा, कोरोनावरची लस कधीपर्यंत मिळेल असं वाटतं? त्यावर उत्तर देताना प्राध्यापक झा म्हणाले की, तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल. मात्र पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

सद्यस्थितीत अमेरिका, युनायटेड किंग्डम इस्राइल यासारख्या देशांमध्ये कोरोनावरील लसीबाबत संशोधन सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात याबाबतची चाचणीही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस येईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही, असे प्राध्यापक झा यांनी सांगितले.

मात्र कोरोनाची लस व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्यास वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण यशस्वी चाचणी आणि इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तातडीने अशा प्रकारच्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे खूप कठीण असेल.  

दुसरीकडे भारतातही कोरोनावरील लस शोधण्यासाठी संशोधकांची अनेक पथके कार्यरत आहेत. त्याला भारत सरकारकडूनही सातत्याने मदत मिळत आहे. त्यामुळे जर भारतात कोरोनाची लस तयास झाली, तरी ते आश्चर्यकारक नसेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

दरम्यान, कोरोनानंतरचे जग पूर्णपणे बदललेले असेल. ही साथ लोकांना एकत्र येण्यास मदत करेल. कारण आज प्रत्येक जण जात-धर्म विसरून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने  एक धोरण ठरवून काम केले पाहिजे. कारण कोरोनाविरोधातील खरी लढाई जमिनीवर लढली जात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: When will the coronavirus vaccine come? Rahul Gandhi's question to professor BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.