शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

"आम्ही पण लस घेणार..."; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरून अखिलेश यादव यांचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 2:42 PM

Covid 19 Vaccine : यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भाजपची लस असा उल्लेख केला होता. लसीकरणावरून आता त्यांनी घेतला यू-टर्न

ठळक मुद्देयापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भाजपची लस असा उल्लेख केला होतालसीकरणावरून आता त्यांनी घेतला यू-टर्न

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचंही मोफत लसीकरण (Free Vaccine for 18 to 44 Years) करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या भूमिकेबाबत यू-टर्न पाहायला मिळाला आहे. आपणही लस घेणार असून ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावं, असं अखिलेश यादव म्हणाले. "जनआक्रोश पाहता अखेर सरकारनं अखेर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राजकारण करण्याऐवजी ते लसीकरण करतील अशी घोषणा केली. आम्ही भाजपच्या लसीच्या विरोधात होतो. परंतु आम्ही भारत सरकारच्या लसीचं स्वागत करतो. आम्हीदेखील लस घेणार आहोत आणि ज्या लोकांचं लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण झालं नाही त्यांनादेखील लस घेण्याचं आवाहन आम्ही करत आहोत," असं अखिलेश यादव म्हणाले. मुलायम सिंह यांनीदेखील घेतली लसउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिह यादव यांनी सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर मुलायम सिंह यादव यांचा फोटो ट्वीट करत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती.अखिलेश यादव यांनी केला होता विरोध यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर प्रश्न उपस्थित करत विरोध केला होता. "भाजपची लस घेणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले होते. "मी भाजपच्या लसीवर कसा भरवसा करू शकतो. जेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही," असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच सर्वांचं मोफत लसीकरण केलं जावं असं ते म्हणाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAkhilesh Yadavअखिलेश यादवMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी