शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

coronavirus: अनलॉक ४ ची नियमावली जाहीर, २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या वर्गांना मुभा; मुंबई लोकल बंदच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 07:08 IST

१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक शाळा बंद तर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीपत्रानंतर मार्गदर्शनासाठी शाळेत येण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होत असताना देशात अनलॉक ४ सुरू होत आहे. दिल्लीत ७ सप्टेंबरपासून पुन्हा मेट्रो धावेल मात्र मुंबई लोकल ठप्पच राहील. १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक शाळा बंद तर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीपत्रानंतर मार्गदर्शनासाठी शाळेत येण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. यापुढे गृह खात्याशी चर्चा न करता राज्यांना लॉकडाऊन करता येणार नाही. १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक ४ लागू होईल. कंटेनमेंट झोनवासीयांना ३० सप्टेंबरपर्यंत दिलासा नाही. आता देण्यात येणारी मुभादेखील या झोनमध्ये लागू होणार नाही. रेल्वे, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मल्टिप्लेक्स थिएटर्स बंदच राहतील.सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होणार असली तरी अनेक महत्त्वाचे निर्णय २१ सप्टेंबरनंतरच अमलात आणले जातील. १०० पर्यंत उपस्थिती मर्यादा घालून देत अनेक कार्यक्रमांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोविड शिष्टाचाराचे पालन करावे लागेल.हे निर्बंध राज्यांना हटवता येणार नाहीत. कंटेनमेंट झोन वगळता लॉकडाऊनसाठी केंद्राशी चर्चा (कन्सल्टेशन) आवश्यक आहे. आंतराराज्य प्रवास, शेजारी देशांशी व्यापार दळणवळणास परवानगी असेल. परंतु ई-पासची गरज असणार नाही.हे सुरू होणार७ सप्टेंबरपासून दिल्लीत मेट्रो पुन्हा धावणार. तत्पूर्वी प्रवासी मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात येईल. शहर विकास मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त निर्णयांनंतरच प्रवासाचे नियम ठरणार आहेत. मुंबई लोकल तसेच देशातील इतर शहरातील मेट्रोला तूर्त परवानगी नाही. २१ सप्टेंबरपासून काही व्यवहारांना सशर्त परवानगीसामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी. सहभागी संख्या १०० पेक्षा जास्त नकोखुल्या थिएटर्समध्ये कार्यक्रम आयोजनास परवानगी. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग ३० सप्टेंबरपर्यंत बंदच. २१ सप्टेंबरला नवी मार्गदर्शिका प्रसिद्ध झाल्यावर थोडी सूट शक्य.शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येण्याची परवानगी, मात्र केवळ आॅनलाइन शिकवणे वटेलि-समुपदेशनासाठीच.नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत मार्गदर्शनासाठी येण्याची मुभा, पण पालकांची लेखी सहमती आवश्यक.कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत येणाºया सर्व प्रशिक्षण संस्था सुरू होणार.पीएच.डी. व तांत्रिक तसेच व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाण्याची परवानगी. प्रयोगशाळा तसेच प्रात्यक्षिकाची गरज असणाऱ्यांनाच याचा लाभ घेता येणार.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई