शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊनच्या समाप्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांची चर्चा, रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 15:38 IST

‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता केंद्र सरकारने सोमवारी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्र्यांची टीम देशातील लॉकडाऊन हटविण्यासाठी विचारविमर्श करत असल्याचे वृत्त द संडे एक्सप्रेसने दिले आहे. संरक्षणमंत्रीराजनाथ सिंह हे याा टीमचे नेतृत्व करत असल्याची माहिती आहे. 

‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे. पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, आम्ही अशा प्रकारच्या बातम्या व वदंता कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या निदर्शनास आणल्या; तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त करून त्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. ‘लॉकडाऊन’ची मुदत वाढविण्याचा कोणताही विचार नाही. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्र्यांकडून लॉकडाऊनबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अधिक काळासाठी लॉकडाऊन ठेवता येत नसल्याचं अनेक मंत्र्यांनी म्हटलं आहे. 

देशातील ७०० जिल्ह्यांपैकी २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संकट दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दैनिक भास्कर वृत्त समुहाने, १४ एप्रिलनंतर देशातील रेल्वेसेवा सुरळीत सुरु होईल की नाही, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होईल की नाही, हे अद्याप ठरलं नसल्याचंही वृत्त आहे. ‘लॉकडाऊन’चे बऱ्यापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता.  त्यानंतर,  ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. 

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेministerमंत्रीRajnath Singhराजनाथ सिंह