शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील; सुब्रमण्यम स्वामींच्या इशाऱ्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 8:21 AM

Corona Virus third wave: सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या दाव्यावर कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण पाहता स्वामींचा दावा गंभीरतेने घेण्याची गरज आहे. 

Corona Third Wave: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेने (Corona second wave) हाहाकार माजविला आहे. केंद्र सरकारने नुकतीच तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तविली आहे. याच वेळी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर  (Corona third wave) एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यामध्ये लहान मुले, बालके (Childrens) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल. स्वामी यांनी ट्विट करून हा दावा केला आहे. (corona Virus third wave will targets children unless strict precautions now are taken.)

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोना तिसऱ्या लाटेच्या दाव्यावर कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना झालेली कोरोनाची लागण पाहता स्वामींचा दावा गंभीरतेने घेण्याची गरज आहे. 

मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. यामुळे कोणत्याही हवाल्याशिवाय स्वामींनी ही गोष्ट सांगणे म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारखे आहे. आधीच लोक दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे भीतीच्या छायेखाली आहेत. स्वामींच्या या दाव्याच्या काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने हिवाळ्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता जाहीर केली. मात्र, या लाटेत कोण कोण प्रभावित होतील हे सांगितले नाही. 

केंद्राच्या सल्लागारांनी काय सांगितले?  देशात कोरोनाच्या दुसºया लाटेनंतर तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झाले पाहिजे.के. विजयराघवन यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत  वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत  औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा