सरकारी आकड्यांवर विश्वास नाय; कोरोनाविरोधात लढण्यासाठी राहुल गांधींनी सुचवले हे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:27 IST2020-03-30T13:36:54+5:302020-03-30T15:27:26+5:30
राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत

सरकारी आकड्यांवर विश्वास नाय; कोरोनाविरोधात लढण्यासाठी राहुल गांधींनी सुचवले हे उपाय
नवी दिल्ली - जागभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने भारतातही गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. देशातील कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला काही उपाय देखील सुचवले आहेत.
आतापर्यंत देशात कोरोनाच्या चाचण्या फार कमी प्रमाणावर झाल्या आहेत, त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. सध्या देशात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 100 लॅब कार्यरत आहेत. त्यापैकी काही लॅब आतापर्यंत पुरेशा कार्यरत झालेल्या नाहीत. आतापर्यंत देशात 25 हजार जणांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत.
कोरोना महामारी गंभीर स्थिति में पहुँच चुकी है। लेकिन, इससे भयभीत होने के बजाय समझदारी से काम लेने की आवश्यकता है। सरकार को रणनीतिक स्तर पर इससे निपटने की जरूरत है। pic.twitter.com/3qKnbOW6l9
— Congress (@INCIndia) March 30, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत, कोरोनाच्या साथीने गंभीर रूप धारण केले आहे. मात्र त्यामुळे घाबरून न जाता समजूतदारपणाने वागण्याची गरज आहे. तसेच सरकारने कोरोनाविरोधात रणनीतिक पातळीवर लढण्याची गरज आहे. त्याबरोबरच राहुल गांधींनी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
राहुल गांधींनी कोरोना विरोधात सरकारला सुचवलेले काही उपाय पुढीलप्रमाणे
- सामाजिक सुरक्षेला बळकट करावे, त्यासाठी प्रत्येक सार्वजनिक साधनांचा वापर व्हावा
- मोलमजुरी करणाऱ्या गरीबांना मदत आणि राहण्याची सोय करावी
- बेड आणि व्हेंटिलेटरने सज्ज असलेल्या रुग्णालयांची स्थापना करावी
- अत्यावश्यक उपकरणांच्या निर्मितीवर भर द्यावा
- तसेच कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णांचा शोध घेण्यासाठी तपासणीच्या प्रमाणात वाढ करावी