शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 12:11 IST

Coronavirus : लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आणि आवश्यक सेवा सुरू आहेत.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आणि आवश्यक सेवा सुरू आहेत. एसबीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा यासह काही बँका त्यांच्या ग्राहकांना कॅश डिलिव्हरी करण्याची सुविधा देत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण त्यांना बँकेने घरबसल्या काही सुविधा दिल्या आहेत.

स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनची माहिती घेता येणार आहे. बँकेने यासाठी खास आयव्हीआर (IVR) सेवा सुरू केली आहे. तसेच SBI तुमच्या घरी कॅश पोहोचविण्याची सुविधा देते. एवढेच नाही तर एसबीआय तुमच्या घरी येऊन पैसे जमा करण्याचीही सुविधा देते. मेडिकल इमरजन्सीवेळी एसबीआय ग्राहकाला 100 रुपयांचे शुल्क आकारते. या सुविधेचा लाभ उठवून तुम्ही या वेगळ्या सेवेचा लाभ घेऊ शकता.

 IVR सुविधेचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या

 -    बँकेच्या कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये 1800-425-3800 किंवा 1800-11-2211 वर फोन करा.

-    तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.

-    आपल्या रजिस्टर्ड बेस्ड क्रमांकाच्या सेवेसाठी 1 डायल करा.

-    शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा 1 डायल करा.

-    आयव्हीआरच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी 1 डायल करा किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी 2 डायल करा.

 IVR सुविधा केवळ एकच व्यक्ती वापरत असलेल्या बचत खातेधारकांसाठी आहे. तसेच यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक एकाच खातेधारकाच्या नावावर रजिस्टर असणं गरजेचं आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका

Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण  

Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा

Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSBIएसबीआयbankबँकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMONEYपैसा