Coronavirus: Shocking! 21-year-old girl in UK died due to Corona virus pnm | Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झालेल्यापैकी ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची ही रुग्णया मुलीला याआधी कोणताही त्रास नव्हता कुटुंबाने लोकांना केले आवाहन, व्हायरसला गांभीर्याने घ्या

लंडन –  चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसचे ४ लाख ७१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत तर २१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, ब्रिटन, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे वयोवृद्ध तसेच नवजात बालकांच्या जास्त धोका पोहचतो असं सांगितलं जात होतं.

मात्र ब्रिटनमध्ये एका २१ वर्षाच्या मुलीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी या मुलीला कोणताही आजार नव्हता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यापैकी ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची ही रुग्ण आहे. ब्रिटनच्या बकिंघमशायर येथे राहणारी चलाई मिडल्टनच्या आईने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली जी व्हायरल होत आहे. ब्रिटनमध्ये ट्विटर आणि फेसबुकवर लोकांनी RIP Chloe असा ट्रेंड सुरु केला आहे.

चलोईच्या कुटुंबाने सांगितले की, यापूर्वी चलोईला कोणताही तब्येतीचा त्रास नव्हता. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांनी या व्हायरसला हलक्यात घेऊ नका. घरात राहणं जास्त सुरक्षित आहे. जगभरात, कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या आता खूप वेगाने वाढत आहे. तथापि, चीनमधील वुहानमध्ये कोरोना विषाणूंमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, याचठिकाणाहून व्हायरस जगभरात पसरला होता.

इटली, स्पेन येथे सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे, जिथे दररोज शेकडोच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि अमेरिकेसह इतर देशांनाही मोठा धोका आहे. भारतात कोरोना विषाणूचे प्रमाणही वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी तीन आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा देशभर करण्यात आली आहे. यावेळी, देशभरातील लोकांना आपल्या घरात रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील वैज्ञानिक या व्हायसरच्या वाढीवर अभ्यास करत आहेत. त्यांना एका व्हायरसपेक्षा दुसरा व्हायरस जास्त ताकदवर असल्याचे आढळलेले नाही. सार्स-कोव्ह -2 विषाणूमुळे कोविड - 19 आजार होतो. सार्स हा कोरोना विषाणूसारखाच आहे जो पाख्यांमध्ये आढळतो. कोरोनाचा संसर्ग गेल्या वर्षी झाला होता. हा व्हायरस पेंगोलिन जमातीपासून पसरल्याचे बोलले जाते. या प्राण्याची तस्करी औषध बनविण्यासाठी केली जाते. वैज्ञानिक आता कोरोनाच्या वेगवेगळ्या १००० व्हायरसवर संशोधन करत आहेत. जॉ़न हाफकिन्स विद्यापीठातील आण्विक अनुवंश शास्त्रज्ञ पीटर थिलेन हे या विषाणूंचा अभ्यास करत आहेत. वुहानमध्ये पसरलेला मूळ विषाणू आणि अमेरिकेमध्ये सापडलेल्या विषाणूमध्ये केवळ चार ते १० अनुवांशिक फरक नोंदविण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Shocking! 21-year-old girl in UK died due to Corona virus pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.