coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:21 AM2020-08-01T08:21:53+5:302020-08-01T08:32:54+5:30

देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे.

coronavirus: The rapid pace of increase Corona patient, these five states growing concern of government | coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

Next
ठळक मुद्दे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओदिशा आणि केरळमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दर सर्वाधिकआतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्ण सापडलेल्या १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पाच राज्यातील कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग अधिकया राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर आता आजपासून देशात अनलॉक-३ च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओदिशा आणि केरळमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दर सर्वाधिक आहे.

आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्ण सापडलेल्या १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पाच राज्यातील कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग अधिक आहे. आंध्र प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दैनिक दर हा ९.३ टक्के होता. तर बिहारमध्ये हा दर ६.१ टक्के होता. याशिवाय कर्नाटक, ओदिशा आमि केरळमध्ये दररोजच्या रुग्णवाढीची टक्केवारी सात टक्क्यांहून अधिक आहे.

आंध्र प्रदेशमध्ये दर एक लाख लोकांमागे १४५ बेडस् उपलब्ध आहेत. तर केरळमध्ये हे प्रमाण २५४ एवढे आहे. कर्नाटकमध्ये प्रतिलाख लोकसंख्येमागे सर्वाधिक म्हणजे ३९२ खाटा उपब्ध आहेत. तर बिहारमध्ये प्रति एक लाख लोकांमागे केवळ २६ बेड आहेत. ओदिशामध्येही चिंताजनक परिस्थिती असून, येथे दर एक लाख लोकांमागे केवळ ५६ बेड्स आहेत. देशातील प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागील बेड्सच्या उपलब्धतेची सरासरी ही १३७.६ एवढी आहे.

दरम्यान, बिहार आणि ओदिशामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे, कारण येथे तुलनेने कमी चाचण्या होत असूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी चाचण्या होत आहेत. बिहारचा टेस्टिंग दर देशातील सर्वात कमी आहे. तिथे दर एक हजार लोकांमागे केवळ चार जणांच्या टेस्ट होत आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने राज्यात कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: coronavirus: The rapid pace of increase Corona patient, these five states growing concern of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.