शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान काय करताहेत?, मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:51 IST

Coronavirus: लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 वर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले. मात्र तरीही अनेकजण आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करत आहे. पंतप्रधानांनी Be Corona Warrior अशा एका मोहिमेला सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरात आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे. पंतप्रधान मोदी लॉकडाऊनदरम्यान घरात काय करतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मन की बातमधून रविवारी मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना तुमचं फिटनेस रुटीन काय आहे? असा प्रश्न विचारला होता. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी लोकांना लॉकडाऊनच्या काळात प्रकृतीची कशी काळजी कशी घ्यावी हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (30 मार्च) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपला योगासनं करतानाचा 3D व्हिडीओ शेअर केला आहे. 'मी कोणताही फिटनेस तज्ज्ञ नाही. दररोज योगासनांचा सराव करणं हा माझ्या आयुष्यातील अंतर्गत विषय आहे. अनेक वर्षांपासून मी योगासनांचा सराव करत असून याचा मला फायदाही झाला आहे. मला खात्री आहे की, तुमच्याकडेही फीट राहण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतील, हे पर्याय देखील तुम्ही इतरांसोबत शेअर करायला हवेत' असं मोदींनी म्हटलं आहे.

मोदींनी जनतेला सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांचा दिनक्रम आरोग्यपूर्ण राहावा यासाठी तुम्ही लोकांना प्रोत्साहित करा असं आवाहनही केलं आहे. तसेच आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ विविध भाषांमध्येही उपलब्ध आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता असा सल्ला देत योगासन करण्याच्या सरावासाठी जनतेला पंतप्रधानांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुक्रवारी (27 मार्च) एका लेकीच्या पत्राचा व्हिडीओ शेअर केला होता. एका मुलीने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं. यामध्ये तिने आपल्या बाबांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली. घराबाहेर पडू नका, तुम्ही घराबाहेर पडलात तर कोरोना जिंकेल. घरी येण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा कोरोना आपल्यावर आणखी वर्चस्व गाजवेल. जिथे आहात तिथे राहा, असा सल्ला मुलीने पत्रातून आपल्या वडिलांना  दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : समोसा भिजवा दो... कंट्रोल रुमला फोन करणाऱ्याची पोलिसांनी खोड मोडली, अशी शिक्षा दिली

Coronavirus : देशसेवेसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी त्यांनी केला तब्बल 450 किमी पायी प्रवास

Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीFitness Tipsफिटनेस टिप्सIndiaभारतDeathमृत्यू