coronavirus: ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:43 AM2020-09-01T05:43:40+5:302020-09-01T05:44:22+5:30

मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका यांनी आपल्या अध्ययनात असा दावा केला आहे की, जर लस उपलब्ध झाली नाही तर, भारतात २०२१ मध्ये प्रतिदिन रुग्णांची संख्या २.८७ लाख एवढी होऊ शकते.

coronavirus: Patient population in India to increase in October ?, US Institute claims | coronavirus: ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावा

coronavirus: ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावा

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारतात दररोज ८० हजार कोरोना रुग्ण आढळून येत असताना तज्ज्ञांचे असे मत आहे की, भारतात आॅक्टोबरमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते तर, नोव्हेंबरच्या सुरुवातीला यात घसरण सुरु होऊ शकते.
पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयही संभ्रमात पडले आहे. कारण, अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. तसेच, सणासुदीचे दिवस असल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते. मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका यांनी आपल्या अध्ययनात असा दावा केला आहे की, जर लस उपलब्ध झाली नाही तर, भारतात २०२१ मध्ये प्रतिदिन रुग्णांची संख्या २.८७ लाख एवढी होऊ शकते. तथापि, आरोग्य मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, गणितीय
मॉडेल सरकारी प्रयत्नांकडे लक्ष देत नाहीत.
मिशिगन विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. भ्रामर मुखर्जी यांनी सरकारला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असे मला वाटत नाही. अनेक तज्ज्ञांनी जुलै- आॅगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. देशातील २७ पैकी २२ राज्यांत रुग्णवाढ वेगाने अद्याप सुरू व्हायची आहे. महाराष्ट्र,
पश्चिम बंगाल आदी राज्यांची रुग्णसंख्या अत्युच्च होणे अद्याप बाकी आहे.

बरे होण्याचे प्रमाण अधिक
देशात जुलैमध्ये दररोज ५० हजार नवे रुग्ण आढळून येत होते. तर, आॅगस्टमध्ये हा आकडा ५८ हजारांपर्यंत पोहचला आणि आता ८० हजारांच्या जवळ आला आहे. मात्र, मृत्यूदर केवळ २ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के एवढे आहे.

Web Title: coronavirus: Patient population in India to increase in October ?, US Institute claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.