शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus: मुंबई नाही आता या शहरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग, तीन दिवसांत सापडले पाच हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 4:44 PM

आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५ हजार ४ रुग्ण सापडले आहेतदिल्लीत आतापर्यंत ६५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहेसध्या दिल्लीमध्ये कोरोनाचे १४ हजार ४५६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे.  सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. तसेच देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या राज्यांच्या यादीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५ हजार ४ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९ हजार ८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. २८ मे नंतर दिल्लीत कोरोनाच्या रुग्णवाढीचा विस्फोट झाला असून, दररोज सरासरी एक हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तीन जून रोजी दिल्लीत तब्बल १५१३ नवे रुग्ण सापडले होते. दोन महिन्यांनंतर प्रथमच दिल्लीमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तीन जून रोजी मुंबईत १२७६ नवे रुग्ण सापडले होते. 

सध्या दिल्लीमध्ये कोरोनाचे १४ हजार ४५६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात ३३ हजार ६८१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर गुजरातमध्ये कोरोनाचे ४ हजार ७६२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण

२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द

कोरोना आला, वादळ झाले, आता आकाशातून पृथ्वीवर येणार तिहेरी संकट

coronavirus: कोरोनामुळे तिजोरीत खडखडाट; मोदी सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगिती

लॉकडाऊन चारमध्ये सूट मिळाल्यानंतर दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या काळात मुंबई आणि अहमदाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली नाही. दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्याने अधिक रुग्ण सापडत असल्याचा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढून १६३ झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीMumbaiमुंबई