शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 1:04 AM

देशात १६ हजारांवर, तर महाराष्ट्रात ८ हजार ७०२ नवे रुग्ण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ११ लाख ४२ हजार २९० आरोग्य सेवकांना लस देण्यात आली असून यात दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ३१ हजार ९६८ व्यक्तींचा समावेश आहे.

देशातील १ कोटी ३० लाख ६७ हजार ४७ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. यातील ३ लाख ९५ हजार ८८४ व्यक्तींना गुरुवारी लस दिली गेली. लसीकरणात उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशात आतापर्यंत १३ लाख ७० हजार ७३९ लस देण्यात आली. यातील ११ लाख ६७ हजार २८५ आरोग्यसेवकांना पहिल्या तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख ३ हजार ४५४ जणांचे लसीकरण झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक ८ हजार ७०२ रुग्ण आढळले.

केरळमध्ये ३,६७७, तामिळनाडू ४६७, कर्नाटक ४५३ तसेच गुजरातमध्ये ४२४ रुग्णांची भर पडली. गुरुवारी महाराष्ट्रातील ५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. केरळमध्ये १४, पंजाब १३, छत्तीसगढ ८ तसेच कर्नाटकमध्ये ७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात आतापर्यंत २१ कोटी ४६ लाख ६१ हजार ४६५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ३१ हजार ८०७ तपासण्या गुरुवारी झाल्या.

जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकजगातील ६०पेक्षा अधिक देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. जगातील अन्य देश भारताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे अनुकरण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

लसीकरणात  ही राज्ये मागे

छत्तीसगढ ३५.६५% नागालँड ३५.११% तेलंगणा ३५.०३% मिझोरम ३४.७३% पंजाब ३३.५८% गोवा ३३.३६% अरुणाचल २६.५०% तामिळनाडू २५.१६% मणिपूर २३.७६% आसाम २३.३४% अंदमान २२.८९% मेघालय २१.०४% पद्दुचेरीत ६.८१% 

उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ

देशामध्ये सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी  कोरोनाचे १६ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १० लाख ६३ हजार झाली. पैकी १ कोटी ७ लाख ५० हजार लोक बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांत वाढ झाली असून, त्यांची संख्या १ लाख ५५ हजार व प्रमाण १.४१ टक्के झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकजगातील ६०पेक्षा अधिक देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. जगातील अन्य देश भारताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे अनुकरण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

अमेरिकेत पाच कोटी लोकांना दिली लस 

अमेरिकेमध्ये आतापर्यंत पाच कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सत्तासूत्रे स्वीकारली त्याला १०० दिवस जेव्हा पूर्ण होतील तोवर १० कोटी लोकांना लस देण्याचा निर्धार या देशाने केला आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की,  लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क घालावा व सतत हात धूत राहावे. लस घेण्याबरोबरच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हे तीन उपायही तितकेच महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस