शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

CoronaVirus News : कोरोना लसीसाठी भारतानं तिजोरी उघडली; कोट्यवधींची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 11:17 PM

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जगभरातील राष्ट्रांना मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी 15 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. 

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटाचा जगातील अनेक देश सामना करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस विकसित करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न चालवले आहेत. तर काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचाही दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ब्रिटनच्या वतीने आयोजित कोरोना लसीकरण समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय वॅक्सीन गठबंधन असलेल्या गावीला 15 मिलियन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जगभरातील राष्ट्रांना मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी 15 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. मोदी म्हणाले, गावीला आमचं समर्थन फक्त वित्तीय स्वरूपात नाही आहे, तर भारताची मोठी मागणी जागतिक स्तरावर लसीची किंमत कमी करू शकते. अशा संकटाच्या काळात भारत हा जगाबरोबर एकजुटीनं उभा आहे. कमी पैशात गुणवत्तापूर्ण औषधं निर्माण करणं ही आमची खासियत आहे. मानवतेची सेवा हा आमचा उद्देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जवळपास 35 देशांतील प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. जेणेकरून 2025पर्यंत जगातील सर्व गरीब देशांतील 300 दशलक्षाहून अधिक मुलांना लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी 7.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमवता येतील, असा या परिषदेचा उद्देश होता. पीएम मोदी म्हणाले, संसर्गजन्य रोगांवरील लसीकरणाच्या महत्त्वाच्या मोहिमेत जगातील भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, भारताच्या पाठिंब्याची अनेक देशांना आवश्यकता आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या मिशन इंद्रधनुषचंही महत्त्व अधोरेखित केलं. गर्भवती महिलांचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. जगातील सुमारे 60 टक्के मुलांना लसीकरण करण्यात यावे, यासाठी आम्ही योगदान देत असल्यानं भाग्यशाली आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत. 

हेही वाचा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या