CoronaVirus News : pm modi pledges usd 15 mn to global vaccines alliance gavi | CoronaVirus News : कोरोना लसीसाठी भारतानं तिजोरी उघडली; कोट्यवधींची मदत जाहीर

CoronaVirus News : कोरोना लसीसाठी भारतानं तिजोरी उघडली; कोट्यवधींची मदत जाहीर

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटाचा जगातील अनेक देश सामना करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस विकसित करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न चालवले आहेत. तर काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचाही दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ब्रिटनच्या वतीने आयोजित कोरोना लसीकरण समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय वॅक्सीन गठबंधन असलेल्या गावीला 15 मिलियन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित शिखर परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जगभरातील राष्ट्रांना मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी 15 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. 

मोदी म्हणाले, गावीला आमचं समर्थन फक्त वित्तीय स्वरूपात नाही आहे, तर भारताची मोठी मागणी जागतिक स्तरावर लसीची किंमत कमी करू शकते. अशा संकटाच्या काळात भारत हा जगाबरोबर एकजुटीनं उभा आहे. कमी पैशात गुणवत्तापूर्ण औषधं निर्माण करणं ही आमची खासियत आहे. मानवतेची सेवा हा आमचा उद्देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जवळपास 35 देशांतील प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. जेणेकरून 2025पर्यंत जगातील सर्व गरीब देशांतील 300 दशलक्षाहून अधिक मुलांना लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी 7.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमवता येतील, असा या परिषदेचा उद्देश होता. 

पीएम मोदी म्हणाले, संसर्गजन्य रोगांवरील लसीकरणाच्या महत्त्वाच्या मोहिमेत जगातील भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, भारताच्या पाठिंब्याची अनेक देशांना आवश्यकता आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या मिशन इंद्रधनुषचंही महत्त्व अधोरेखित केलं. गर्भवती महिलांचे संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. जगातील सुमारे 60 टक्के मुलांना लसीकरण करण्यात यावे, यासाठी आम्ही योगदान देत असल्यानं भाग्यशाली आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत. 

हेही वाचा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा

चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : pm modi pledges usd 15 mn to global vaccines alliance gavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.