शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Coronavirus: दाहकता! ७ महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालायचंय; मजुरांची अवस्था पाहून काळजात धस्स होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:15 PM

राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे शेकडो मजुरांची दयनीय अवस्थाकंपन्या बंद पडल्याने मजूर गावाकडे चाललेमजुरांची भीषण अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक मालकांनी त्यांच्या मजुरांना कामबंद करण्याची सूचना दिली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा लॉकडाऊन आवश्यक असला तरी त्याची दुसरी भीषण बाजू समोर येऊ लागली आहे. गुरुग्राममध्ये नोकरी करणाऱ्या राजकुमारसोबत हा अनुभव येत आहे. त्याच्या मालकाने त्याला घरी जायला सांगितल्यानंतर तो घरी जाण्यास निघाला.

राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही. यातच गुरुग्रामला बसून काहीच होणार नाही. पण याठिकाणाहून जाण्याचंही साधन नाही. राजकुमारने पत्नी, तीन महिन्याचा मुलगी आणि ५८ वर्षीय आईला घेऊन बुधवारी सकाळी गावाकडे जाण्यासाठी पायपीट सुरु केली. त्याच्यासारखे हजारो लोक रस्त्यावरुन चालत त्यांच्या गावी जात आहेत. राजकुमार यांनी दिवसभरात दिल्लीत पार करुन ५० किमी अंतर गाठलं होतं. काही स्थानिकांच्या मदतीने त्यांना जेवणाची पाकीटं मिळाली. रस्त्यावर पायपीट करणारे लोक पुढे चालत असतात, कोणतीतरी गाडी मिळेल हीच अपेक्षा त्यांना असते.

दिल्लीच्या एनसीआरमधून अचानक निघालेल्या लोकांची ही गर्दी हायवेवर पाहायला मिळते. जे लोक गावाकडे जायला निघालेत. हे कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. कंपन्या बंद पडल्याने एका क्षणात हे सगळे बेरोजगार झालेत. या लोकांचे गावाकडे पलायन करणं सरकारसाठीही चिंतेचा विषय बनलं आहे. लॉकडाऊनचा अर्थ लोकांना धोक्यात घालणं नसून लोकांची गर्दी रोखणं हे आहे.

बुधवारी संध्याकाळपर्यंत गाझियाबादला पोहचलेल्या राजकुमारने सांगितले की, लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं. कंपनी मालकाने घरी जाण्यास सांगितले. पण घराचं भाडं कसं देणार? गावाकडे परतण्याखेरीज माझ्याकडे काहीच इलाज नाही. सर्व पूर्वपदावर आल्यानंतर मालकाचा कॉल येईल तेव्हा परत जाईन असं तो म्हणाला. तर मनोज ठाकूर हा गाझियाबादच्या वैशालीमध्ये एका कारखान्यात काम करतो. आनंद विहार बस टर्मिनलमधून त्यांना बस न मिळाल्याने १० तास चालत ते दादरी येथे पोहचले. दुपारी ३ वाजता चालण्यास सुरुवात केली त्यानंतर रात्री १ वाजता दादरी येथे पोहचलो. माझ्याकडे जेवणाचं पाकीट आहे पण पाणी नाही. हायवेवर एकही दुकान नाही. मनोजला यूपीतल्या एटा जिल्ह्यातील घरी पोहचायचा आहे. अजूनही १६० किमी चालायचं आहे.

सात महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालण्याची तयारी

अजमेरच्या ओमप्रकाश कुशवाहा यांची सात महिन्याची मुलगी आहे. त्यांना वाटेत कोणतीही गाडी सापडली नाही तर त्यांना घरी पोहचण्यासाठी सुमारे आठवडाभर चालत जावे लागणार आहे. गुरुवारी अशा लोकांची गर्दी दिल्ली-जयपूर महामार्गावरुन आपापल्या घराकडे जात होती. सर्वांकडे सामना, लहान मुलं आहेत. बर्‍याच जणांची एकच तक्रार आहे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी आधी सांगितलं का नाही?  फरीदाबादपासून 550 कि.मी. अमेठीला चालत निघालेले प्रताप गुप्ता म्हणाले,आम्हाला जर पूर्वी माहित असते तर आम्हाला चालत जाण्याची गरज पडली नसती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी