शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 11:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. ई-पास असल्यास अडकलेले लोक प्रवास करून आपलं घर गाठू शकतात.

सोलन - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. ई-पास असल्यास अडकलेले लोक प्रवास करून आपलं घर गाठू शकतात. मात्र काही जण याचा गैरफायदा देखील घेत आहेत. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. 

हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टॅक्सी चालकानं पैसे कमवण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे. चालकाने आपल्या आईच्या आजारपणाचं खोटं कारण देत पास मिळवला आणि रेड झोनमध्ये तीन प्रवाशांना घेऊन गेला. यात एक लहान मुलगा, महिला आणि पुरुष यांचा समावेश होता. दरम्यान या तिघांना आता होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालक, महिला आणि पुरुष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिक्षक शिव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या आजारपणाचं कारण देत या चालकाने पास मिळवला आणि सांगितले की 2 लोकांना घेऊन उत्तर प्रदेश जात आहे. मात्र तो एकटा गेला आणि येताना तीन लोकांना रेड झोनमध्ये घेऊन आला. त्यानंतर या चालकाने सरकारी केंद्रात क्वारंटाईन न होता होम क्वारंटाईन होणार असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतरही तो बाहेर फिरत राहिला. शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तपासात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धोका वाढला! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

बापरे! एक चूक झाली अन् सर्वांना कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स

CoronaVirus News : 1 जूनपासून धावणार 200 स्पेशल ट्रेन्स; प्रवासाआधी जाणून घ्या नवे नियम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिस