CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 10:59 AM2020-08-15T10:59:10+5:302020-08-15T11:00:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 25 लाखांच्या वर गेला आहे. 

CoronaVirus Marathi News Spike of 65,002 cases in India the last 24 hours | CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

Next

नवी दिल्ली - कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 25 लाखांच्या वर गेला आहे. 

देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25,26,193 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,036 वर पोहोचला आहे.

 

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. याच दरम्यान पंतप्रधानांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.  

"कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना संबोधित करताना देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

"कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

भयंकर! एकटं राहण्यासाठी 'तो' कुटुंबाच्या जीवावर उठला, आईस्क्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Web Title: CoronaVirus Marathi News Spike of 65,002 cases in India the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.