शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

CoronaVirus News : 'या' गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना प्रवेश नाही, पोस्टर लावल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 7:21 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत हे पोस्टर हटवलं आहे.

कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अशा संघर्ष काळात काही अशा घटना समोर येत आहे ज्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका भाजपा आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश तिवारी यांनी मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मध्य प्रदेशमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. 

मध्य प्रदेशातील पेमलपूर या गावात मुस्लीम व्यापाऱ्यांना गावात प्रवेश नाही असं पोस्टर झळकलं आहे. इंदूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टरची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत हे पोस्टर हटवलं आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात हे पोस्टर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर हटवण्यात आले असले तरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटनेे याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी जमशेदपूरच्या फळांच्या दुकानांवर विश्व हिंदू परिषदेच्या पोस्टर्सची छायाचित्रे समोर आली आहेत. या पोस्टरमध्ये हिंदू फळांचे दुकान लिहिलेले आहे आणि ते दुकानाच्या बाहेर लावण्यात आलं आहे. पोस्टरबाबत जमशेदपूर पोलिसांनीही लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मेरठमधील व्हॅलेंटीस कर्करोग रुग्णालयाने अशी जाहिरात प्रकाशित केली आहे की ज्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली आहे त्याच मुस्लिमांनी यावे. मुंबईत एका व्यक्तीने मुसलमान असल्याने मुलाकडून डिलिव्हरी सामान घेण्यास नकार दिला. याशिवाय दिल्लीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात भाजीपाला किंवा इतर हाताळणी करणारे आधार कार्ड पाहून एन्ट्री दिली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 500 रुपयांसाठी त्या आजींनी रात्रभर केला 50 किमी पायी प्रवास पण....

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस