शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात भारी, 'ही' आकडेवारी सुखावणारी

By सायली शिर्के | Updated: September 21, 2020 10:24 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: दररोज 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण हे आढळून येत आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल तीन कोटींवर गेला असून रुग्णांची संख्या 31,239,588 वर पोहोचली आहे. तर 965,065 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. दररोज 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण हे आढळून येत आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 

देशात अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले आहे. आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. भारतात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा हा जगभरात सर्वाधिक आहे. तब्बल 43 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच जगभरातील कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारताची आहे. 

कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल

अमेरिकेला मागे टाकत भारताने कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत जगात अव्वल स्थान मिळवले आहे. 43 लाखांपेक्षा अधिक लोकांनी देशात कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील आहे. Worldometers नुसार, भारतानंतर कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत 18.70 टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी ब्राझील असून त्यांच्या रिकव्हरी रेट हा 16.90 टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि दक्षिण अफ्रिका आहे.

आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. जवळपास 33 टक्के दिल्लीकरांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. सीरो सर्व्हेनुसार, दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत 66 लाख जणांना कोरोनाची लागण झाली होती. 17 हजार नमुने घेण्यात आले होते. या सर्वेतील महत्त्वाचे मुद्दे पुढच्या आठवड्यात जाहीर केलं जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे अँटीबॉडी विकसित झाल्यामुळे बरे झालेल्या लोकांचा आकडा हा वाढू शकतो. पहिल्या सीरो सर्व्हेमध्ये 23 टक्के तर दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये 29 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळून आली होती. दिल्ली सरकारने दर महिन्याच्या सुरुवातीला सीरो सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. कोरोनाबाबत संशोधकांनी  एक दावा केला आहे. आयोडीनमुळे 15 सेकंदात कोरोनाचा नष्ट होणार असल्याचा मोठा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने (Iodine) नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. मात्र याआधी करण्यात आलेल्या काही रिसर्चमध्ये आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भातील हा दावा फेटाळून लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"

PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"

भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूAmericaअमेरिका