CoronaVirus Marathi News icmr who disagreeing with hcq assessment SSS | CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहोचला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 

कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा वापर थांबवला आहे. मात्र भारतात याचा वापर सुरू आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या संदर्भात WHO ला एक पत्र लिहिलं आहे. भारतात या औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम दिसून आलं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे. 

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाचण्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या या औषधांच्या डोसमध्ये मोठी तफावत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच कोविड-19 चे गंभीर रुग्ण जे आयसीयूमध्ये भरती आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, सकाळी आणि रात्री 400-400 एमजी डोस दिला जातो. त्यानंतर पुढील 4 दिवस सकाळी आणि संध्याकाळी 200-200 एमजी डोस दिला जातो. एकूण 5 दिवस कोरोनाच्या गंभीर रुग्णांना HCQ चा फक्त 2400 मिलीग्राम डोस दिला जातो.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालय जागतिक आरोग्य संघटनेशी याबाबत सहमत का नाही, याबाबत कारण सांगितलं आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या या औषधात मोठं अंतर आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड-19 रुग्णांना दिला जाणारा डोस 6 तासांत 800 मिलीग्राम x 2 लोडिंग डोस आणि त्यानंतर 10 दिवस 400 मिलीग्राम x 2 डोस दिले जातात. 

11 दिवसांत 9600 मिलीग्रॅम डोस दिला जातो. जो भारतात दिल्या जाणाऱ्या डोसच्या चारपट जास्त आहे. भारतात दिला जाणारा हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा डोस जास्त प्रभावशाली आणि चांगला असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. औषधाचा कमी डोस दिल्यानंतरही रुग्ण ठिक होत आहेत. या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचं सुरुवातीचं यश पाहता आयसीएमआरने डब्ल्यूएचओला पत्र दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान

CoronaVirus News : बिहारच्या ज्योतीकुमारीचा गरीब बाप; चटका लावून जाणारी कहाणी 

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

CoronaVirus News : लढ्याला यश! जगातली सर्वात जलद, स्वस्त टेस्ट किट तयार, फक्त 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार?

CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News icmr who disagreeing with hcq assessment SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.