शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सलाम! ...अन् डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून अंत्यसंस्कारासाठी नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 09:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान तेलंगणामधील एक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून आठ लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. 

डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान तेलंगणामधील एक घटना समोर आली आहे. डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या पेड्डापल्लीमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवत मृतदेह स्मशानभूमीत नेला. 

श्रीराम गारू असं डॉक्टरचं नाव आहे. तेलंगणाच्या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. रुग्णालयात कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच केस असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. त्यामुळे एका ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यास कोणीही तयार नव्हतं. त्यावेळी डॉक्टर श्रीराम गारू यांनी पीपीई किट घालून स्वत: ट्रॅक्टर चालवला आणि मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले. 

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओही जोरदार व्हायरल होत आहे. लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या या गोष्टीचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. देशातील पाच लाख लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. तब्बल 5,53,471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरIndiaभारतTelanganaतेलंगणा