CoronaVirus Marathi News delhi bjp president attacks arvind kejriwal | CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 8,78,254 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,701 नवे रुग्ण आढळून आले असून  500 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळालं आहे. परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मात्र याच दरम्यान भाजपाने केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. 

कोरोनाबाबत परिस्थिती सुधारत असताना दिल्लीचे भाजपा अध्यक्ष आदेश कुमार गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोटं क्रेडिट घेण्याची सवय असल्याचं म्हटलं आहे. "कोरोना संकटाच्या केजरीवाल सरकारने दिल्लीची आरोग्य यंत्रणा दुरुस्त करण्याऐवजी दिल्लीतील लोकांना त्याच अवस्थेत सोडले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला. याचा परिणाम म्हणून दिल्लीत कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या कमी झाली आणि परिस्थिती सुधारू लागली. पण श्रेय घेण्याच्या शर्यतीत आपचे नेते आघाडीवर दिसतात" असं गुप्ता यांनी सांगितलं. 

"जर क्रेडिट चोरीबद्दल आणि जाहिरातीत दिसण्याचा काही पुरस्कार असता तर तो अरविंद केजरीवाल यांनाच मिळाला असता" असं म्हणत गुप्ता यांनी केजरीवालांना टोला लगावला आहे. तसेच "दिल्लीत कोरोना संसर्ग रोखण्यात यश येत आहे पण ते फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरच शक्य आहे. दिल्ली 24 मार्च ते 14 जून 2020 या काळात कोरोना चाचणी घेण्यात येत नव्हती किंवा लोकांना वेळेवर बेड आणि उपचार मिळत नव्हते" असं देखील आदेश कुमार गुप्ता यांनी म्हटलं आहे. 

खासगी रुग्णालये उपचारांसाठी पाच ते 15 लाख रुपये आकारत होती आणि केजरीवाल सरकार जाहिरातींद्वारे त्याचे मार्केटींग करण्यात व्यस्त होते. 14 जूननंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीची आरोग्य व्यवस्था निश्चित करण्यासाठी कमांड घेतली. ज्यानंतर कोरोना चाचणी दर अर्धा करण्यात आला आणि रॅपिड एंटीजन टेस्टिंग सुरू केली गेल्याचं देखील गुप्ता यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video 

Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल

CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...


 

English summary :
CoronaVirus Marathi News delhi bjp president attacks arvind kejriwal and his government for not tackling covid 19 cases

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News delhi bjp president attacks arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.