CoronaVirus News: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 14 लाखांचा टप्पा, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 09:22 PM2020-07-26T21:22:28+5:302020-07-26T21:26:55+5:30

राज्यात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 296 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. यात तब्बल 3 लाख 75 हजार 799 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

CoronaVirus Marathi News covid-19 cases reach on 14 lakh in India | CoronaVirus News: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 14 लाखांचा टप्पा, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

CoronaVirus News: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 14 लाखांचा टप्पा, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

Next
ठळक मुद्देदेशात आतापर्यंत तब्बल 14 लाख 11 हजार 954 जणांना करोनाची लागण.महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 9 हजार 431 नवे रुग्ण.राजधानी दिल्लीत आता केवळ 11 हजार 904 सक्रिय रुग्ण.

नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांची संख्या 14 लाखच्याही पुढे गेली आहे. रविवार आलेल्या नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल 14 लाख 11 हजार 954 जणांना करोनाची लागण झाली आहे. covid19india.orgच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 4 लाख 77 हजार 228 सक्रिय रुग्ण आहेत. 9 लाख 01 हजार 959 जणांना रुग्णालयातून जिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 32 हजार 350 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातील महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा र्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रात रविवारी 6 हजार 44 नव्या कोरोनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 2 लाख 13 हजार 238 कोरोनाबाधित ठणठणीत झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 56.74% एवढा आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 9 हजार 431 नवे रुग्ण -

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 9 हजार 431 नवे रुग्ण आढळून आले. तर 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर 3.63% एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 296 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. यात तब्बल 3 लाख 75 हजार 799 जणांना कोरोनाची लागण झाल्याचेआढळून आले आहे.

तमिलनाडूमध्ये रविवारी 6 हजार 986 नवे रुग्ण -

तमिलनाडूमध्ये रविवारी 6 हजार 986 नवे रुग्ण आढळले. याच बरोबर आता राज्यातील संक्रमितांचा आकडा 2 लाख 13 हजार 723 वर पोहोचला आहे. तामिलनाडूमध्ये कोरोनाच्या  चपाट्यात आल्याने आतापर्यंत 3 हजार 494 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात तब्बल 53 हजार 703 रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. तर आतापर्यंत तब्बल 1 लाख 56 हजार 526 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिल्लीचा रिकव्हरी रेट 87.95 टक्के -
राजधानी दिल्लीलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राजधानीत आतापर्यंत 1 लाख 30 हजार 606 जणांना कोरोना व्हायरचे संक्रमण झाले आहे. येथे आता केवळ 11 हजार 904 सक्रिय रुग्ण आहेत. तर 1 लाख 14 हजार 875 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून जिस्चार्ज मिळाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे 3 हजार 827 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे, दिल्लीचा रिकव्हरी रेट 87.95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट

कोरोना अजूनही पूर्वी प्रमाणेच घातक!, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी करायला सांगितला 'हा' मोठा संकल्प

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

Web Title: CoronaVirus Marathi News covid-19 cases reach on 14 lakh in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.