"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 05:25 PM2020-07-24T17:25:08+5:302020-07-24T17:31:44+5:30

भाजपाचे काही नेते काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत येतात. आता मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री वादात सापडले आहेत. त्यांनी पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक हऊन जाईल, असा दावा केला आहे.

minister arjun ram meghwal claim Bhabhiji Papad Will be Helpful to fight Corona virus video viral | "पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

Next
ठळक मुद्देमेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले आहेत. या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज डेव्हलप होतील, असा दावा करण्यात आला आहे.आत्मानिर्भर भारतअंतर्गत, एका उद्योजकाने ‘भाभी जी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत.

नवी दिल्ली -भाजपाचे काही नेते काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत येतात. आता मोदी सरकारमधील संसदीय कार्यमंत्री अर्जून राम मेघवाल चर्चेत आले आहेत. मेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले आहेत. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते, पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा करत आहेत. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी डेव्हलप होतील अँटीबॉडीज -
मोदी सरकारमधील मंत्री आणि बिकानेरचे भाजपा खासदार अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते एका प्रायव्हेट कंपनीचा पापड लॉन्च करण्यात आला. हा पापड लॉन्च करतानाचा त्याचा व्हिडिओही आता व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत, "या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज डेव्हलप होतील," असा दावा मेघवाल यांनी केल्याचे दिसत आहे.  एवढेच नाही, तर "आत्मानिर्भर भारतअंतर्गत, एका उद्योजकाने ‘भाभी जी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत. हे कोरोना व्हायरसचा सामना करण्यात अत्यंत उपयोगी ठरतील. त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला आशा आहे, की ते यशस्वी होतील," असेही मेघवाल या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

कंपनी काय म्हणते -
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री हातात पापडाची दोन पाकिटं घेऊन उभे असल्याचेही दिसत आहेत. पापड तयार करणारी ही कंपनी बिकानेरमधील आहे. तसेच या कंपनीने दावा केला आहे, की या पापडात गिलोय आणि इम्युनिटी वाढवणारी सामग्री टाकण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर मंत्री मेघवाल आणि कंपनीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

Read in English

Web Title: minister arjun ram meghwal claim Bhabhiji Papad Will be Helpful to fight Corona virus video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.