CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 05:32 PM2020-07-26T17:32:17+5:302020-07-26T17:54:28+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आजवर सहा लाखून अधिक लोकांना कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशात ऑक्सफर्डने तयार केलेली लस एक आशेचा किरण आहे. सध्या भारतासह जगातील अनेक देशांत लसींची चाचणी सुरू आहे.

भारता शेजारील चीनही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यात तो मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतानाही दिसत आहे. मात्र, ऑक्सफर्डच्या लसीचे एक वैशिष्ट्य आहे. तर जानून घेऊया कशा प्रकारे काम करते ऑक्सफर्डची लस आणि काय आहे तिची खासियत.

चिंपांजीच्या व्हायरसपासून तयार केली लस - ऑक्सफर्डमध्ये कोरोना लस तयार करण्यासाठी चिंपांजीच्या अॅडिनो व्हायरस म्हणजेच, सर्दी-खोकल्याला कारण ठरणाऱ्या व्हायरसचा वापर करण्यात येत आहे. या व्हायरसपासून कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. कारण या व्हायरसला अत्यंत क्षीण करण्यात आले आहे.

यात व्हेक्टरला (वाहक) चिंपांजीच्या अॅडीनो व्हायरसमधून (ChAdOx1) घेण्यात आले आहे. जेव्हा ChAdOx1 एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जाईल तेव्हा एक विशेष प्रकाचे प्रोटीन तयार करेल आणि यानंतर मानवी शरीरात कोरोनाचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतील.

दीर्घकाळ परिणाम कारक? - लॅन्सेटने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या लोकांवर या लसीची चाचणी करण्यात आली, त्यांच्यावर या लसीचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

या चाचणीत, एक डोस दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात झाली आणि टी सेलही तयार झाल्या.

टी- सेल या दीर्घकाळ काम करत असतात. तसेच दुसऱ्यांदा इन्फेक्शन झाले, तर त्या पुन्हा व्हायरसचा सामना करण्यासाठी तयार होतात.

असे करते काम - पहिल्या टप्प्यात कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीनच्या जेनेटिक कोडचा शोध लावला गेला. दुसऱ्या टप्प्यात चिंपांजीच्या अॅडीनो व्हायरसला जेनेटिकली मॉडिफाय करून स्पाइक प्रोटीन तयार करण्यात येतात.

शरीरात गेल्यानंतर हे प्रोटीन कोरोनाची अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करतात.

साइड इफेक्ट? - लसीच्या चाचणीनंतर काही साईड इफेक्टदेखील दिसून आले. यात ताप येणे, डोकेदुखी आणि इंजेक्शन दिलेल्या जागी रिअॅक्शनसारख्या गोष्टी निदर्शनास आल्या. मात्र, याचा परिणाम फारसा नव्हता. त्या काही वेळाने अपोआप बऱ्याही झाल्या.