CoronaVirus Marathi News boy with girl dressup going meet girlfriend SSS | CoronaVirus News : प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडसाठी 'तो' झाला 'ती' अन् घडलं असं काही...

CoronaVirus News : प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडसाठी 'तो' झाला 'ती' अन् घडलं असं काही...

सूरत - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये 31मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून दीड लाखांच्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमुळे सध्या प्रेमी युगुलांना भेटणं अशक्य झालं आहे. घरातून बाहेर पडता येत नसल्याने एकमेकांना भेटणं कठीण झालं आहे. अशातच लॉकडाऊनमध्ये लपून छपून भेटणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. गर्लफ्रेंडला भेटता येत नसल्यामुळे तरुण प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने थेट मुलीचा पोषाख परिधान केला. गुजरातच्या वलसाडमध्ये ही अजब घटना घडल्याची माहिती मिळत आहे. गर्लफ्रेंडला भेटता यावं यासाठी त्याने पंजाबी ड्रेस घातला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि तो पकडला गेल्याची घटना घडली आहे.

तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महिलांची आणि मुलींची चौकशी करत नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हा मार्ग काढला. रात्री तीनच्या सुमारास आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला बाहेर गेला. मात्र गस्त घालताना पोलिसांनी त्याला पाहिलं. तेव्हा मुलगा पंजाबी ड्रेसमध्ये आपला चेहरा झाकून फिरत होता. पोलिसांनी मुलाला थांबवलं आणि विचारपूस केली असता हा सगळा अजब प्रकार समोर आला आहे.

 

पोलिसांनी तरुणाला विचारल्यानंतर तो काही बोलू शकला नाही. त्यनंतर पोलिसांनी ओढणी काढली तेव्हा खरा प्रकार समोर आला. ओढणी काढल्यानंतर हा मुलगा असल्याचं पाहून पोलीस कर्मचारीही चक्रावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने ओढणीने तोंड झाकले होते. पोलिसांना टाळण्यासाठी त्याने असा गेटअप केल्याचं सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...

Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News boy with girl dressup going meet girlfriend SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.