Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:20 PM2020-05-27T12:20:22+5:302020-05-27T12:23:44+5:30

अम्फान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

clashes erupted between people two slums west bengals metiabruz area SSS | Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

Next

कोलकाता - देशावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच 'अम्फान' या चक्रीवादळामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'ने थैमान घातले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. अम्फान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान एकमेकांना मदतीचा हात देण्याऐवजी लोकांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. 

कोलकाताच्या मेटिआबरूज परिसरात एका छोट्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. वीज कनेक्शनवरून जोरदार राडा झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटांमधील वाद विकोपाला गेल्याने अखेर पोलिसांना यावं लागलं. परिसर शांत करण्यासाठी पोलिसांना दगडफेक आणि हवेत गोळीबारही करावा लागला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  अम्फान चक्रीवादळानंतर झोपडपट्टी भागात वीज कनेक्शनवरून दोन गटांमध्ये वाद झाला. पुढे हा वाद विकोपाला गेला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. दरम्यान पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी दगडफेक आणि गोळीबार करावा लागला आहे. सध्या या परिसरातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

Web Title: clashes erupted between people two slums west bengals metiabruz area SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.