शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News : बापरे! वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या ज्वेलरचा कोरोनाने मृत्यू, 100 जणांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 08:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 18,000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही सहा लाखांच्या वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असताना दुसरीकडे हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका ज्वेलरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ज्वेलरने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये शेकडो लोक होते. त्यामुळे आता जवळपास 100 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील एका ज्वेलरने नियमांचं उल्लंघन करत वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. परिसरातील अनेक दिग्गज मंडळींसह 100 लोकांनी या पार्टीसाठी हजेरी लावली होती. जंगी पार्टीमध्ये मोठया संख्येने लोक उपस्थित होते. मात्र त्यानंतर दोन दिवसांतच ज्वेलरची तब्येत बिघडली. कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणी नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. 

रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेस प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाढदिवसाच्या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांचा तातडीने शोध घेण्या सुरुवात केली आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका व्यक्तीने मुलगा झाल्याच्या आनंदात मिठाई वाटली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची घटना समोर आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण

CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूIndiaभारतhospitalहॉस्पिटल