CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:03 PM2020-07-04T13:03:18+5:302020-07-04T13:22:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Fact Check: Is this Bharat Biotech VP taking the first dose anti-Covid drug ‘Covaxin’ | CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका वाढत असून रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडत नवा उच्चांक गाठला आहे. रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. 

15 ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात कोव्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस आहे. यानंतर आता सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचा फोटो असून मानवी चाचणीचा भाग म्हणून कोव्हॅक्सिन दिल्याचं म्हटलं आहे. तसेच लसीचा पहिला डोस बीबीआयएलचे उपाध्यक्ष व्ही. के. श्रीनिवास यांना दिल्याचा दावा केला आहे. 


सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या फोटोबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. भारत बायोटेकनेच हा दावा फेटाळून लावला आहे. अशा पद्धतीने लसीची अद्याप कोणतीही मानवी चाचणी करण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. व्हायरल होत असेलला फोटो हा रक्त घेण्याच्या प्रक्रियेचा असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी भारत बायोटेकने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. "व्हॉट्सअ‍ॅपवर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला फोटो आणि मेसेज भारत बायोटेकद्वारे प्रसारित केलेले नाहीत. कर्मचार्‍यांच्या चाचणीसाठीची ही एक रक्त काढण्याची प्रक्रिया आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या उपचारांसाठी नवंनवी औषधे बाजारात येत आहेत, पण आयुष मंत्रालयानं अशा औषधांना परवानगी दिलेली नाही.  विशेष म्हणजे या औषधांनी कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा संबंधित कंपन्यांकडून दावा केला जात आहे. पण देशात पहिलीच तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिनची लस कोरोनापासून लोकांना वाचवू शकते, अशीही आशा व्यक्त केली जात आहे. ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतीय बाजारात उपलब्ध करून दिली जाऊ शकते.  7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी या लसीला परवानगी मिळाली आहे. कोरोनावर लस बनवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. पण त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी कोव्हॅक्सिनला परवानगी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा

CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी

देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

Web Title: Fact Check: Is this Bharat Biotech VP taking the first dose anti-Covid drug ‘Covaxin’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.