CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:47 PM2020-07-04T14:47:18+5:302020-07-04T14:55:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

CoronaVirus Marathi News SSLC exam concludes with 32 students testing positive | CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Next

बंगळूरू - देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 22,771 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18655 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकामध्ये जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 25 जून पासून ही परीक्षा सुरू झाली होती. मात्र परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची घटना समोर आली होती. 

इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला. शाळेतील तब्बल 261 मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तर जवळपास 6800 मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. NPR ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुलं आहेत. यानंतर 6800 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी घेतला 'मेक इन इंडिया' Covaxin चा पहिला डोस?, जाणून घ्या सत्य

संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा

CoronaVirus News : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' प्रभावी औषधाचा डोस केला कमी

देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी

CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन


 

Web Title: CoronaVirus Marathi News SSLC exam concludes with 32 students testing positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.