शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Lockdown 4 : 17 मेनंतर पुन्हा वाढणार लॉकडाउन!; 'या' क्षेत्रांमध्ये सूट देण्याची तयारी, काय आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या मनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 00:13 IST

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार अर्थात, 18 मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या टप्प्यात हॉटस्पॉट निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि   मास्क लावण्यासारखे नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील.

ठळक मुद्देचौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.ऑरेंज झोनमध्येही बऱ्यापैकी सूट देण्यात येण्याची शक्यता.रेड झोनमधील कंटेनमेंट एरियांमध्येच कठोरपणे लॉकडाउन पाळला जाईल.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मेरोजी संपत आहे. मात्र, यानंतरही लॉकडाउन सुरूच राहणार, असे स्पष्ट संकेत सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना लॉकडाउन अद्याप पूर्णपणे हटणार नाही, असे म्हटले होते. याच वेळी, त्यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अधिक प्रमाणात सूट देण्याचे संकेतही दिले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार अर्थात, 18 मेपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ग्रीन झोन पूर्ण पणे उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या टप्प्यात हॉटस्पॉट निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग आणि   मास्क लावण्यासारखे नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील.

आणखी वाचा - CoronaVirus News : वैज्ञानिक तयार करतायेत असा मास्क, जो कोरोना व्हायरसच्या संपर्कात येताच बदलेल रंग

ऑरेंज झोनमध्येही बऱ्यापैकी सूट देण्यात येण्याची शक्यता आहे. तर रेड झोनमधील कंटेनमेंट एरियांमध्येच कठोरपणे लॉकडाउन पाळला जाईल, असे समजते. महत्वाचे म्हणजे, रेड झोनमध्ये सलून, चश्म्याची दुकानं खुली करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासंदर्भात, सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य सरकारांच्या प्रस्तावानंतर, गृह मंत्रालय जारी करेल. राज्य सरकारांना शुक्रवारपर्यंत त्यांचे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, असाम आणि तेलंगाणा यांची लॉकडाउन सुरूच ठेवण्याची इच्छा आहे. यांपैकी, झोन निश्चित करण्याचा अधिकार, आमच्याकडे असावा, अशी काही राज्यांची इच्छा आहे.  सध्या लॉकडाउन पूर्णपणे हटवण्याची कोणत्याही राज्याची इच्छा नाही. मात्र, हळू-हळू आर्थिक व्यवहार सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

आणखी वाचा - कुणी 6 Pack, कुणी 8 Pack; संसदेत काम करणाऱ्या तरुणांची बॉडी पाहून व्हाल अवाक

काही प्रमाणावर वाहतुकीची परवानगी -लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कंटेनमेंट एरिया शिवाय, सर्वच ठिकाणी लोकल ट्रेन, बस आणि मेट्रो सेवादेखील काही अंशी सुरू केली जाऊ शकते. तसेच ऑटो आणि टॅक्सींनाही परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, यासंदर्भात अंतिम निर्णय राज्यांचा असेल. ऑरेंज आणि रेड झोनमध्ये बाजार खुले करण्याचा निर्णयही  राज्यांनाच घ्यायचा आहे. कंटेनमेंट भाग वगळता रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्याची तयारी सुरू आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये तर त्यांना आधीपासूनच ही परवानगी देण्यात आलेली आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : रोहिंग्या मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या 'रिफ्यूजी कॅम्प'मध्ये घुसला कोरोना, येथे राहतात तब्बल 10 लाख लोक

राज्य सरकारांची इच्छा -देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यामुळे मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे येथे कोठोरपणे लॉकडाउन सुरू ठेवण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि दुसऱ्या राज्यांत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीची परवानगी देण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. तसेच गुजरात, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळची आर्थिक व्यवहार सुरू करण्याची इच्छा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिशा सारख्या राज्यांची राज्यात लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदीसह लॉकडाउन सुरू ठेवण्याची इच्छा आहे.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीGujaratगुजरातTelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशOdishaओदिशाMumbaiमुंबईPuneपुणे