कुणी 6 Pack, कुणी 8 Pack; संसदेत काम करणाऱ्या तरुणांची बॉडी पाहून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 09:28 PM2020-05-15T21:28:33+5:302020-05-15T22:04:57+5:30

क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी आज पाच तरुणांचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. हे पाचही तरूण सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. शिकण्याची गोष्ट ही, की हे तरून आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत फिटनेसवरही तेवढेच लक्ष देत आहेत.

क्रीडामंत्र्यांनी या तरुणांचा एक व्हिडिओ पोस्ट करत याचा संबंध फिट इंडिया मुव्हमेंटशी जोडला आहे. तसेच देशातील नागरिकांनाही कोरोना व्हायरसशी लढताना आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

रिजिजू यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतील पाचही तरुण सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. नोकरी सुरू केल्यानंतर त्यांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष वळवले. नोकरीसोबतच जबरदस्त बॉडी बिल्डिंग करून हे तरुण आता बॉडी बिल्डिंग कॉम्पिटीशनमध्येही भाग घेत आहेत. या फोटोतील सलिल कुमार, हे संसदेत लायब्ररी सहायक म्हणून कार्यरत आहेत.

किरण रिजिजूंनी केली तारीफ - हे बिल्डर लॉकडाउनपूर्वी एका बॉडी बिल्डिंग कॉम्पिटीशनमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. यांचा फिटनेस पाहून किरण रिजिजू यांनीही त्यांचे तोंड भरून कौतुक केले. यांचं नाव आहे, मुकेश रावत, हे संसदेत सेक्रटरी असिस्टंट आहेत.

फिटनेस एक्सपर्ट तरुण गिल यांनी करून दिली या तुरुणांची ओळख - या पाचही तरुण बॉडिबिल्डर्सचा व्हिडिओ प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट तरुण गिल यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. फोटोत अमन त्यागी, हे संरक्षण मंत्रालयात कार्यरत आहेत.

पहिल्यांदाच घेतला बॉडी बिल्डिंग कॉम्पिटीशनमध्ये भाग - तरुण गिल यांनी, या तरुणांशी संवाद साधताना विचारले, की त्यांना बॉडी बिल्डिंगची आवड कशी लागली. हे पाचही जण म्हणाले, ते पहिल्यांदाच या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटीशनमध्ये भाग घेत आहेत आणि आणखी कठोर परिश्रम करून येथेही स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची इच्छा आहे. फटोमध्ये, अमित हुड्डा, हे संरक्षण मंत्रालयात सेक्रटरी असिस्टंट आहेत.

या तरुणांनी सांगितले, की ते आपली दैनंदिन नोकरी करून घरी आल्यानंतर आपल्या फिटनेस रुटीनप्रमाणे, डायट घेतात आणि जिममध्ये तासंतास व्यायाम करतात. स्वतःला फिट ठेवण्यात आनंद वाटतो. फोटोतील अरविंद, हे आयकर विभागात कार्यरत आहेत. (सर्व फटो, TG टॉक्स मीडियाहून घेतले आहेत.)

क्रीडामंत्री किरेण रिजिजू यांचे ट्विट.