शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

Coronavirus : 'देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा', केजरीवालांचा पंतप्रधानांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 3:20 PM

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 230 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 7000 हून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमावर पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संवाद साधला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं जावं असा सल्ला दिला आहे. तसेच केजरीवालांनी काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाऊन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे असं मत मांडलं आहे. 'लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे. एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात सुरू ठेवणं योग्य नाही' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. हा कालावधी 14 एप्रिलला संपणार आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊन वाढवण्याची गरज जवळपास काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. या बैठकीनंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याबद्दलची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबतच दिल्ली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे