Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 01:07 PM2020-04-11T13:07:21+5:302020-04-11T13:13:15+5:30

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 500 रुपये रोख जमा केले आहेत.

coronavirus lockdown police arrested women jan dhan money 500 rupees SSS | Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Next

भोपाळ - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना  जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जान है तो जहान है... असं म्हणत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. नाही तर देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. मात्र तरीही अनेक जण घराबाहेर पडत आहे. पण अशा व्यक्तींवर पोलीस कारवाई करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 500 रुपये रोख जमा केले आहेत. मात्र लॉकडाऊनवेळी महिलांना जनधन योजनेतून मिळालेले 500 रुपये आणायला जाणं चांगलचं महागात पडलं आहे. तब्बल 10 हजारांचा दंड भरावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनधन खात्यात सरकारने 500 रुपये टाकले आहेत. याची माहिती मिळताच मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये महिला मोठ्या संख्येनं बँकेत पोहोचल्या. यामुळे गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही.

मध्यप्रदेशातील 39 महिलांना लॉकडाऊनवेळी जनधन योजनेतील 500 रुपये तर मिळाले नाहीतच पण त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचं उल्लंघन केल्या प्रकरणी 39 महिलांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यांच्यावर 151 अंतर्गत कारवाईसुद्दा केली. त्यानंतर 10 हजार रुपयांचा दंड भरल्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 239 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा  

CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार

 

Web Title: coronavirus lockdown police arrested women jan dhan money 500 rupees SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.