Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 02:11 PM2020-04-11T14:11:01+5:302020-04-11T15:17:37+5:30

Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. 

coronavirus death in america more than 2000 dead SSS | Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

googlenewsNext

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,02,842 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 17,03,002 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,77,082 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. 

अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2108 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 503,177 झाली असून आतापर्यंत 18,761जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. मात्र, मृतांची संख्या इटलीमध्ये जास्त आहे. जगात कोरोना मृतांचा आकडा पाहिला तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये 18,849 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा 


 

Web Title: coronavirus death in america more than 2000 dead SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.