CoronaVirus Live Updates : "माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज"; मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांचं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:17 PM2021-05-29T18:17:25+5:302021-05-29T18:27:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या परिस्थितीसमोर सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.  

CoronaVirus Live Updates corona case increased in meghalaya then the government said pray to god | CoronaVirus Live Updates : "माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज"; मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांचं विधान 

CoronaVirus Live Updates : "माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज"; मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांचं विधान 

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 2,77,29,247 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,73,790 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,617 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,22,512 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मेघालयमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. या महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीसमोर तिथलं सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.  

मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी एक विधान केलं आहे." माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपण कुणीच नाही" असं म्हटलं आहे. तसेच येत्या 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्वांना आपल्या घरी आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं आहे. मेघालय सरकारनं त्यासंदर्भात परिपत्रकच काढलं आहे. मेघालयमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 731 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! गुळण्या करून कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ओळखा; ICMR ने दिली नव्या पद्धतीला मंजुरी

कोरोना संक्रमणादरम्यान करोना चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना फक्त तीन तासांत या कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळू शकेल. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य 'कलेक्शन ट्यूब'मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. 

एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. सोल्युशन गरम केल्यानंतर एका 'RNA' टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर 'आरटी-पीसीआर' प्रक्रिया केली जाते. 'नीरी'चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं. लोक स्वतःहून कोरोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया 'सेल्फ सॅम्पलिंग'ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो. नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसंच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटलं आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates corona case increased in meghalaya then the government said pray to god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.