शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
5
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
6
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
7
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
8
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
9
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
10
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
11
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
12
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
13
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
14
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
15
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
16
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
17
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
18
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
19
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
20
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो

Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 09:28 IST

Coronavirus : 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढणारा हा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.  

तिरुवनंतपुरम – जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. भारतातही आतापर्यंत एकूण 12 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढणारा हा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. केरळच्या कासारगोडमध्ये हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारगोडमधील कोरोनाग्रस्त व्यक्ती ही काही मिनिटांसाठी चार जणांच्या संपर्कात आली होती. त्यानंतर या एका व्यक्तीमुळे 20 मिनिटांत 4 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कासारगोडचे जिल्हाधिकारी डी. संजीत बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तामुळे  4 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. ही व्यक्ती दुबईहून भारतात आली होती. 16 मार्चला त्याला कोरोना व्हायरस असल्याचं निदान झालं.

 कोरोनाची चाचणी झाल्यावर या व्यक्तीला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी 20 मिनिटांमध्येच त्याने तब्बल 4 जणांना कोरोना संक्रमित केल्याची माहिती समोर आली आहे. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4,27,940 वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या 21,000 हून अधिक इतकी झाली आहे.जगभरातील 181 देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 226340 पेक्षा अधिक तर बळींची संख्या 12719 इतकी आहे. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन

Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळDeathमृत्यू