coronavirus : भारत चीनमधून आयात करणार व्हेंटिलेटर्स आणि इतर सामुग्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 11:03 IST2020-03-31T10:59:24+5:302020-03-31T11:03:38+5:30
देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा संभाव्य आकडा विचारात घेऊन केंद्र सरकारने आपात्कालीन उपाययोजनांना सुरुवात केली आहे.

coronavirus : भारत चीनमधून आयात करणार व्हेंटिलेटर्स आणि इतर सामुग्री
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने सरकारसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा संभाव्य आकडा विचारात घेऊन केंद्र सरकारने आपात्कालीन उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने देशातील खासगी उद्योजकांना आरोग्यविषयक साहित्यनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच वाढती गरज विचारात घेऊन सरकारने पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स, N 95 मास्क आणि व्हेंटिलेटर्सची आयात करण्याचा विचार सुरू केला आहे.
दरम्यान, भारत सरकार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स, N 95 मास्क आणि व्हेंटिलेटर्स चीनमधून मागावणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. मात्र चीनमधून टेस्टिंग किट्स मागवण्याबाबत भारताने भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्पेन, युक्रेन या देशांनी चीनमधून मागवलेल्या टेस्टिंग किट्स सदोष असल्याचा दावा केला होता.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत सांगितले की, भारतीय रेडक्रॉस सोसायटीने चीनमधून 10 हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्स मागवले होते. यांची डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, दान स्वरूपात मिळणारे 3 लाख PPE 4 एप्रिलपर्यंत मिळतील. तर 3 लाख PPE बनवण्याची ऑर्डर ऑर्डीनन्स कारखान्यांना दिली आहे.
चीनमधील अलिबाबा फाऊंडेशन आणि अलिबाबा फाऊंडेशन यांच्याकडून दान करण्यात आलेली वैद्यकीय सामुग्री 28 मार्चरोजी भारतीय रेड क्रॉस सोसायटीला मिळाली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, सरकारने सिंगापूरमधील एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मची ओळख पाठवण्यात आली आहे. ही कंपनी 10 लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (PPE) किट्सचा पुरवठा करू शकते. या कंपनीला परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ऑर्डर देण्यात आली आहे. तर नोएडामधील आगवा हेल्थकेअरला 10 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे.