शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:05 IST

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशभरात कोरोनाचे ८ हजार ३९२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देभारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहेकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार १९४ झाली आहे

नवी दिल्ली - भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९० हजार ५३५ झाली आहे. तसेच आतापर्यंत देशात ५ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१ हजार ८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशभरात कोरोनाचे ८ हजार ३९२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशामध्ये २३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार १९४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४ हजार ८३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १ लाख ९० हजारांचा टप्पा ओलांडल्याने भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकत कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. आता केवळ अमेरिका, ब्राझील, रशिया, युनायटेड किंग्डम, स्पेन आणि इटली या देशांमध्येच भारतापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

 दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजारांच्या वर पोहचला आहे तर ५ हजारापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, देशात अनेक झोनमध्ये कोरोनाचं सामुहिक संक्रमण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळत आहे हे मानणं चुकीचे ठरेल. तसेच या टास्कफोर्सने कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजनांवर टीकास्त्रही सोडलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय