शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

12th Class Exam: कोरोना काळातच होणार 12वीची परीक्षा? 19 विषयांची करण्यात आली निवड, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 1:58 PM

केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त बैठकीत, 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, की नको? जर नाही, तर कुठला मार्ग काढावा? यावर चर्चा झाली.

नवी दिल्ली - देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यातच 12वीच्या परीक्षेसंदर्भात मोठे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना काळातच 12वीच्या परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी 19 विषयांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री, सर्व राज्य सरकारांचे शिक्षणमंत्री आणि सचिव यांची आज उच्च स्थरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनीच 12वीच्या परिक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यावरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य ठरेल, असा प्रस्ताव मांडला.

परीक्षा घेतली गेली नाही, तर कुठला मार्ग? बैठकीत चर्चा - केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त बैठकीत, 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, की नको? जर नाही, तर कुठला मार्ग काढावा? यावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या बैठकीत, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी, प्रकाश जावडेकर तथा सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, परीक्षेचे आयोजन करणाऱ्या बोर्डोंचे अध्यक्ष आणि परीक्षेशी संबंधित इतर संस्थांचे अधिकारीही सहभागी झाले होते.

CoronaVirus: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा '3T' फॉर्म्यूला हिट; उत्तर प्रदेशात असा सुरू आहे कोरोनाचा सामना

सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांतील शिक्षण बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसईने 12वीच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. याच बरोबर, एनटीएसह राष्ट्रीय परीक्षांचे आयोजन करणाऱ्या संस्थांनीही परीक्षा स्थगित केल्या आहेत. तर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक 30 मेरोजी परीक्षांसंदर्भात पुढील योजनांसंदर्भात सांगण्यात येईल, असे म्हटले होते. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी, सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक आठवड्यापूर्वीही राज्यांतील शिक्षा सचिवांसोबत बैठक केली आहे. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारTeacherशिक्षक