शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Coronavirus : कोरोनाविषयी चुकीच्या जाहिरातींवर बंदी येणार, लवकरच नवीन नियमावली जारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:32 AM

नव्या नियमांत वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करताना कोरोना विषाणू, कोविद-१९ आणि त्यासंबंधित शब्द वापरण्यास तसेच चुकीचे दावे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांसाठी जाहिराती, स्वच्छता आणि विक्री इत्यादींशी संबंधित नवे नियम केले जात असून, ग्राहक व्यवहार मंत्रालय त्यासाठी विविध हितधारकांशी बोलत आहे. नव्या नियमांत वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करताना कोरोना विषाणू, कोविद-१९ आणि त्यासंबंधित शब्द वापरण्यास तसेच चुकीचे दावे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विक्री साखळीतील वस्तू उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि आयातदार अशा सर्वांनाच नवे नियम बंधनकारक असतील.याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठीही काही नवे नियम केले जात आहेत. त्यानुसार या कंपन्यांना डिलिव्हरी कर्मचारी, किचन, पॅकिंग एरिया आणि डिलिव्हरी वाहने यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्दी आणि फ्लूची लक्षणे असलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना कामावरून दूर करावे लागेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी होऊ नये यासाठीही विशेष नियम केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे किती नग एका ग्राहकाला द्यावेत, याचे नियम संघटित किरकोळ विक्री शृंखलांसाठी करण्यात येणार आहेत.अधिकाºयाने सांगितले की, कोरोना विषाणूबाबत जागृती करणाºया अलीकडील लाईफबॉयच्या मुद्रित जाहिरातींसारख्या जाहिराती मात्र रोखल्या जाणार नाहीत. या जाहिरातीत कोणतेही खोटे दावे करण्यात आलेले नाहीत. याउलट काही उत्पादकांनी कोरोनासंदर्भात खोटे दावे करणाºया असंख्य जाहिराती केल्याचे आढळून आले आहे. मुद्रित माध्यमे, टीव्ही आणि वेबसाईटस्वरून या जाहिराती केल्या जात आहेत.वस्तुंसाठीही नियमआपले उत्पादन कोरोना विषाणूचा नि:पात करते असे दावे या जाहिरातींत करण्यात आले आहेत, अशा जाहिराती बंद करण्यासाठी नवे नियम केले जात आहेत. मास्कचे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यासाठीही काही नियम केले जाणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई