शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Coronavirus : 'शिंका आणि कोरोना पसरवा' म्हणणाऱ्या इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक झाली, नोकरीही गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:59 IST

Coronavirus : कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला त्याला अटकही करण्यात आली आहे.

नवी दिल्ली जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 27,365 लोकांचा मृत्यू झाला असून 597,267 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 133,363 लोक बरे झाले आहेत. भारतात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला  आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खळबळजनक पोस्ट केली आहे.

इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने कोरोना पसरवूया अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने लोकांना घराबाहेर पडा आणि शिंका असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. इन्फोसिसने याप्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर कारवाई केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चला, बाहेर या आणि मोकळ्या जागेत शिंका आणि कोरोना पसरवाअसं म्हटलं आहे. लोकांना कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी भडकवणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आल्याची माहिती बंगळुरूतील पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्फोसिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून इंजिनिअरला कामावरून काढून टाकत असल्याची माहिती दिली आहे. इंजिनिअरने केलेली सोशल मीडिया पोस्ट इन्फोसिसच्या आचारसंहिता आणि समाजाप्रती त्याच्या बांधिलकीच्या विरोधात आहेअसं ही कंपनीने म्हटलं आहे.

भारतात शुक्रवारी (मार्च) आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत नवीन 75 रुग्ण आढळले. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहेही चिंताजनक बाब आहे. याच दरम्यान तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात आहे. या अपघातातजणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसFacebookफेसबुकArrestअटकInfosysइन्फोसिस