शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

China Coronavirus : छोटे कांदे खाऊन कोरोनापासून बचाव करा; हॉटेल मालकाचा अजब उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 4:27 PM

तामिळनाडूतील एका हॉटेल मालकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक अजब उपाय सांगितला आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूतील एका हॉटेल मालकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक अजब उपाय सांगितला आहे.छोट्या कांद्याचा आहारात समावेश केल्याने तसेच खाल्ल्यास त्याचा फायदा होईल असं म्हटलं.ग्राहकांना छोटे कांदे असलेले उत्तप्पा खाण्यासाठी दिले जात असल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली.

कराईकुडी - चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 259  जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9000 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा 4.1 कोटी लोकांना फटका बसला आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूतील एका हॉटेल मालकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक अजब उपाय सांगितला आहे. छोटा कांदा खाऊन बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. 

तामिळनाडूतील एका हॉटेल मालकाने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी छोटे कांदे फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. छोट्या कांद्याचा आहारात समावेश केल्याने तसेच खाल्ल्यास त्याचा फायदा होईल असं म्हटलं आहे. तामिळनाडूत प्रसिद्ध असलेल्या सिद्ध चिकित्सा नावाच्या सिस्टमनुसार छोटे कांदे हे कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळेच हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना छोटे कांदे असलेले उत्तप्पा खाण्यासाठी दिले जात असल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली आहे. 

जगभरात कोरोनामुळे घबराट पसरली आहे. चीनमध्ये आतापर्यंत यामुळे अनेकांचा मृत्यू झाल आहे. मात्र आता चीनच्या बाहेरही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अन्य देशांतही कोरोनाची लागण झाल्याने जागतिक आणीबाणी जाहीर करीत आहोत. आरोग्यसुविधा नसलेल्या देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजू शकतो, हा चिंतेचा विषय आहे. जागतिक आणीबाणी जाहीर केल्याने कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक मदत व साधनसामग्री मिळू शकते. मात्र, विषाणूचा फैलाव झालेल्या देशांत नागरिकांना पाठविण्यास व व्यापारावर नियंत्रणे येतील. चीनच्या काही शहरांत जाणारी विमानसेवा अनेक कंपन्यांनी स्थगित केली आहे. मॅकडोनाल्ड, स्टारबक्स यांनी चीनमधील दुकाने बंद ठेवली आहेत.

भारतात केरळमध्ये पहिला रुग्ण समोर आला आहे. वृत्त एजन्सी शिन्हुआनुसार 1,36, 987 अशा लोकांची ओळख पटली आहे, जे कोरोनाने पीडित लोकांच्या संपर्कात आले होते. ज्या प्रवाशांनी गेल्या दोन आठवड्यांत चीनचा प्रवास केला होता, अशा प्रवाशांच्या प्रवेशास अमेरिकेने अस्थायी बंदी आणली आहे. मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक आणि स्थायी निवासींच्या कुटुंबांचे निकटचे सदस्य यांच्याशिवाय चीनचा प्रवास करून आलेल्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल.

वुहानमध्ये अडकलेल्या सहा भारतीयांना ताप असल्याने एअर इंडियाच्या पहिल्या विशेष उड्डाणात बसू दिले नाही. तेथील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे दुसरे विमान दिल्ली विमानतळावरून दाखल झाले आहे. तत्पूर्वी, एअर इंडियाच्या एका विमानातून चीनच्या वुहानमधून 324 भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. वुहानमधून आणलेल्या भारतीयांत 3 अल्पवयीन, 211 विद्यार्थी आणि 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs NZ : अखेरच्या सामन्यातही भारताचा न्यूझीलंडवर विजय; मालिकेत ५-० असे निर्भेळ यश

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

पदवीधारकांसाठी 5 हजार, पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह 4 जण जखमी

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

 

टॅग्स :corona virusकोरोनाTamilnaduतामिळनाडूonionकांदाDeathमृत्यू