शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 9:57 PM

ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपल्यामुळे लॉकडाऊन काळात मोठे संकट ओढवले होते. पोलिसांकडून सुरु असणारी कडक तपासणीमुळे अत्यावश्यक कारणासाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरू लागले होते.

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे अनेक सरकारी कामे खोळंबली आहेत. महत्वाचे म्हणजे वाहन चालविण्याचे लायसन, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आदी अनेक गोष्टींची मुदत संपलेली आहे. अशा लोकांना केंद्रीय मोटार वाहन नियमांमधून सूट देण्यात आली असून या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. 

देशातील ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचे दस्तावेज, पीयुसी सारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जून च्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि  मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. 

कोणतेही वाहन चालविताना चार कागदपत्रे महत्वाची असतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स आणि पीयूसी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही हार्ड कॉपी ठेवू शकत नसाल तर मोबाईल अॅपवर डिजिटल कॉपी ठेवली तरी चालणार आहे. यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवाहन हे अॅप वापरावे लागणार आहे. नवीन वाहतूक नियम लागू करताना गडकरींनी शिस्त लावण्यासाठी दंडामध्ये १० पटींनी वाढ केली होती. दारू पिऊन वाहन चालविल्यास १० हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. अल्पवयीन वाहन चालविताना सापडल्यास वाहन मालकाला तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येणार आहे. 

 

महत्वाच्या बातम्या...

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीसAutomobileवाहनNitin Gadkariनितीन गडकरी