शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जगातील 197 पैकी 186 देशांना कोरोनाचा विळखा, सध्या केवळ हे मोजके देशच आहेत '100 टक्के' सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 15:11 IST

या संकेतस्थळावरील शनिवारी रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने आतापर्यंत 186 देशांना विळखा घातला आहे. यानुसार आतापर्यंत केवळ 11 देशच असे आहेत, जेथे अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.

ठळक मुद्देसध्या कोरोनापासून जगातील केवळ 11 देशच आहेत सुरक्षित  इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू  फ्रान्समध्ये एका दिसात ११२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीप्रमाणे, जगात एकूण 197 देशांना मान्यता आहे. यांपैकी आतापर्यंत 186 देशांत कोरोनाने हाहाकार घारता आहे. यासंदर्भात 'वल्डोमिटर्स डॉट इंफो' हे संकेतस्थळ ताजे आकडे प्रकाशित करत आहे. 

या संकेतस्थळावरील शनिवारी रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने आतापर्यंत 186 देशांना विळखा घातला आहे. यानुसार आतापर्यंत केवळ 11 देशच असे आहेत, जेथे अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.

या देशांत आहेत एक अथवा केवळ दोन रुग्ण - ज्या देशात इतर देशांतून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. अशा देशांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, असेही काही देश आहेत, की जेथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक अथवा दोन एवढीच आहे. यात फिजी, गांबिया, निकारगुआ आणि कांगोसह भारता जवळील नेपाळ आणि भूतानचा समावेश होतो. नेपाळ आणि भूतानमध्ये अद्याप केवळ एकच रुग्ण आढळला आहे.

या देशांत अद्याप पोहोचू शकला नाही 'कोरोना' - जगातील जे देश अद्याप या महामारीपासून बचावलेले आहेत, त्यांपैकी अधिकांश देश अत्यंत छोटे आणि वैश्विक दृष्ट्या एकाकी आहेत. यापैकी तर अनेक देशांची नावे अशी आहेत, जी तुम्ही क्वचितच ऐकली असतील. या देशांत पलाऊ, तुवालू, वानुआतू, तिमोर-लेस्टे, सोलोमन आयलँड, सिएरा लियोनी, सामोआ, सैंट विंसेट अँड ग्रेनाडिनीज, सैंट किटिस अँड नेविससारख्या देशांचा समावेश होतो. या देशांत अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.

इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू -जगभरात 2 लाख 45 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर तब्बल 11 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतरइटलीला सर्वाधिक फटका बसला असून, कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे. इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

इटलीमधील मुतांची संख्या आतापर्यंत 4825वर गेली आहे. जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीची स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे. इथे कोविड-19 (COVID-19)ची लागण झालेल्यांची संख्या 53578 एवढी आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून 1420 लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये ११२ जणांचा मृत्यूफ्रान्समध्ये शनिवारी कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 562वर पोहोचला आहे. या विषाणूमुळे 6172 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. रुग्णालयात 1525 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतItalyइटलीIranइराणchinaचीनMaharashtraमहाराष्ट्र