Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:50 IST2020-04-09T17:38:38+5:302020-04-09T17:50:24+5:30
Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5000 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन
दंतेवाडा - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5000 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या धास्तीने एका गावाने कोरोना न झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायला नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिल्याने मृतदेह नाल्यात दफन केल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नव्हता. मात्र तरीही कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाला गावात दफन करायला जागा दिली नाही. तर कुटुंबातले लोकही मृतदेहाला खांदा द्यायला तयार झाले नाही.
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या https://t.co/9GFRkiF83C#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
लखमा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचा अचानक मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झालेला नव्हता. गावातील लोकांना मात्र त्याला कोरोना झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी अंत्यसंस्कारासाठी गावात जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने त्याचा दफनविधी नाल्यात करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे एक वृत्त दिले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5000 वर पोहचली आहे. तर 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...https://t.co/oR0cVrdSEJ#coronaupdatesindia#Coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट चुकून निगेटिव्ह समजून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तामिळनाडूमधील विल्लूपूरमच्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या
Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार
Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर