Coronavirus 'We shall win this together', PM Narendra Modi replies to Donald Trump SSS | Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर

Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग सध्या चिंतेत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली होती. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी ट्रम्प आग्रही आहेत. भारताने अमेरिकेला मदतीचा हात दिला आहे.

केंद्र सरकारने पॅरासिटामोल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. कोरोनावरील उपचार करण्यात या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कोरोनाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध भारताने अमेरिकेला देण्याची तयारी दाखवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. ट्रम्प यांच्या धन्यवादानंतर मोदींनी अमेरिकेला उत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे.

मोदींनी ट्विटमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होतील. आपण ही लढाई एकत्र जिंकू असं म्हटलं आहे. 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मी सहमत आहे. मित्रांना अशीच वेळ अधिक जवळ आणते. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होतील, कोरोना विरोधातील मानवतेच्या लढाईत भारत शक्य ते सर्व करेल. आपण ही लढाई एकत्र जिंकू' असा प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्याबाबत भारतीय लोकांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार मानले होते. आपण ही मदत कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले होते. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत केवळ भारतासाठी नाही तर मानवतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मजबूतीने काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,550 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 15,19,571 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: चिंतेत भर! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर; एकट्या मुंबईत ८५७ रुग्ण

Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत कोरोनाने घेतला 8,713 जणांचा बळी, पाहा काय सांगते आकडेवारी

 

Web Title: Coronavirus 'We shall win this together', PM Narendra Modi replies to Donald Trump SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.