Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 02:30 PM2020-04-09T14:30:04+5:302020-04-09T14:46:34+5:30

Coronavirus : नेटफ्लिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून नेटफ्लिक्स युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. लॉकडाऊनमध्ये Netflix आपल्या युजर्सना जास्त आनंद देणार आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे घरी बसून अनेक जण सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा नेटफ्लिक्सवर खर्च करत आहेत. नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याने चांगल्या कंटेंटला ही जास्त मागणी आहे.

नेटफ्लिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून नेटफ्लिक्स युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. लॉकडाऊनमध्ये Netflix आपल्या युजर्सना जास्त आनंद देणार आहे.

नेटफ्लिक्सने आपल्या युजरसाठी एक खास फीचर आणलं असून हे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये Netflix वर आणखी मजा येणार आहे. या खास फीचरविषयी जाणून घेऊया.

सर्वसाधारणपणे एक नेटफ्लिक्स अकाऊंट अनेक जण वापरत असतात. कारण यामध्ये मल्टिपल युजर्स लॉगइन देण्यात येतं. एका अकाऊंटमध्ये वेगवेगळे युजर्स आपलं प्रोफाईल तयार करू शकतात.

युजर्सना प्रोफाईल अ‍ॅक्सेस करायला कोणत्याही पिन किंवा पासवर्डची गरज नव्हती. मात्र आता नव्या फीचरच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रोफाईल हे पिनने लॉक करता येणार आहे.

एका नेटफ्लिक्स अकाऊंटच्या माध्यमातून जर पाच फॅमेली मेंबर्सची प्रोफाईल्स असतील तर हे सर्व मेंबर्स आपलं प्रोफाईल पासवर्ड लावून लॉक करू शकतात.

नेटफ्लिक्स प्रोफाईलसाठी युजर्स चार डिजिटचा पासवर्ड सेट करू शकतात. मात्र आता सध्या फक्त वेब ब्राऊजरवरून नेटफ्लिक्स लॉगइन करून पिन सेट करता येईल.

एकदा वेब ब्राऊजरवरून नेटफ्लिक्स युजर्स प्रोफाईल पिन सेट करू शकतात. त्यानंतर ते सर्व प्लॅटफॉर्मवर काम करू शकतात. म्हणजेच नेटफ्लिक्स ओपन केल्यानंतर युजर्सकडे प्रोफाईल अ‍ॅक्सेस करण्यासाठी पिन मागितला जाईल.

वेब ब्राऊजरवरून आपलं नेटफ्लिक्स अकाऊंट लॉगइन करा त्यानंतर होम पेजवर उजव्या कोपऱ्यात असलेल्या अकाऊंटवर क्लिक करा. क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसतील.

प्रोफाईल अँड पेरेंटेल कंट्रोल दिसेल. ज्यामध्ये नेटफ्लिक्स आकाऊंटचे सर्व युजर प्रोफाईल दिसतील. जे प्रोफाईल लॉक करायचं आहे तिथे जाऊन ड्रॉप डाऊन अ‍ॅरोवर टॅप करा. आणि प्रोफाईल लॉकवर क्लिक करा.

लॉक करण्यासाठी सर्वप्रथ नेटफ्लिक्सचा पासवर्ड मागितला जाईल. त्यानंतर चार डिजिट पिन सेट करा. पिन टाकल्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रोफाईल लॉक करता येईल.