coronavirus: "Corona victims cross 20 lakh mark, but Modi government is missing", criticizes Rahul Gandhi | coronavirus: "कोरोनाबाधितांनी केला २० लाखांचा टप्पा पार, पण गायब आहे मोदी सरकार", राहुल गांधींची टीका

coronavirus: "कोरोनाबाधितांनी केला २० लाखांचा टप्पा पार, पण गायब आहे मोदी सरकार", राहुल गांधींची टीका

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या सातत्याने वाढत असलेल्या संख्येवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका २० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार, राहुल गांधीनी लगावला टोला गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ६२ हजार रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या २०.२५  लाखांहून अधिक

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा दररोज चिंताजनक वेगाने वाढत आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने वीस लाखांचा टप्पा ओलांडला असून, कोरोनाबाधितांच्या सातत्याने वाढत असलेल्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. "२० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार" असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

राहुल गांधी यांनी १७ जुलैरोजी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, जर याच वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला तर १० अॉगस्टपर्यंत २० लाखांहून अधिक लोक बाधित होतील. त्यामुळे याबाबत सरकारने सुनियोजित पावले उचलण्याची गरज आहे. 

राहुल गांधी यांनी जेव्हा हे ट्विट केले होते तेव्हा देशातील कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांवर गेली होती. आता राहुल गांधी यांनी केलेले भाकीत खरे ठरल्याचे समोर आले. आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ अॉगस्ट रोजीच वीस लाखांचा टप्पा पार केला आहे. 

दरम्यान, देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच कोरोनाबाबत  अपडेट देणाऱ्या एका संकेतस्थळानुसार गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ६२ हजार रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या २०.२५  लाखांहून अधिक झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४१ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: "Corona victims cross 20 lakh mark, but Modi government is missing", criticizes Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.